Skip to main content

Recalculate The world- 5

समाज मन
नवे राज्य , नवे सरकार , नवा राजा , नवा विचार .
केद्रीयस्थानी नवे सरकार आल्यापासून भारतातील शक्ती स्थानांमध्ये थोडा जिव परत येतोय. पुर्वीचे सरकार आणि राज्यघटना याचेमुळे ही शक्तीस्थाने मरणासन्न अवस्थेत पोहचली होती आणि म्हणूनच त्यांच्यावर स्वाभिमान सोडून आरक्षण मागण्याची वेळ  आली.
  ही शक्तीस्थाने म्हणजे भारताचे एक एक अभेद्य असे गडकोट आहेत हा प्रत्येक गडकोट कील्ला उत्तुंग बुरुजाप्रमाणे आहे हा ढासळला म्हणजे भारत ढासळला एव्हाना यांची नावे तुमच्या लक्षात आलीच असतील  ती म्हणजे मराठा, शिख, जाट, राजपुत, बुंदेले, पटेल, नायक, यादव, नेपाळी, गोरखा, बोडो, बंगाली, ... इत्यादी
 यामधील मराठा या सर्वाधीक व अती महत्वाच्या गडकोटाबद्दल आपण बोलू . याची छाया सुर्य तळपतीला असतांना कटकपासून अटकपर्यंत पसरते
हा एकटाच इतका खंबिर आहे की संपुर्ण भारतवर्षाचे संरक्षण  करु शकतो त्यांचे प्रतीनिधीत्व करणारी इंडीयण आर्मिची मराठा बटालियन तर तुम्ही जाणताच. माञ काही काळापासून त्यांना इतके क्षतिग्रस्त केल्या गेले आहे की त्याचे जगणेच अवघड झाले आहे आणि हे पातक राज्यकर्त्यांच्या शिरावर जाते . कारण यांच्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण केले गेले नाही , यांच्या गरजांकडे व मुल्यव्यवस्थांकडे लक्ष दील्या गेले नाही.
   सद्यस्थितीत मराठा समाज विछन्न अवस्थेत  पोहचला असून ग्रामीण भागांत दोनचार सधन मराठा घरे सोडली तर बाकी सर्व दारीद्र्यात जखडले गेले आहेत. याची कारणे काय?, याला जबाबदार कोण?, विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत यापैकी 80%-90% लोक मराठा कुणबी आहेत याची कारणे कोणती? महाराष्ट्र मराठ्यांचा महाराष्ट्रातील 14 पैकी साधारणता 10 मुख्यमंत्री मराठा तरीही ही अवस्था  मराठ्यांवर त्यांनी राज्यघटना  स्विकारली तीचा सन्मान केला पण यामुळेच त्याची मुले बेकारी सहन तर करत नाहीना, कींवा यामुळेच तर त्यांच्या जमीनींची ही दशा तर केली नाही ना? त्यांच्या मुली पळवून नेण्यासाठी चिञपटांमधून व नेत्यांच्या भाषणांतून संक्षेप केले जात आहेत आणि आता तर या घटनाक्रमाने शेवटचे टोकच गाठले आहे ते म्हणजे त्यांच्या मुलींचे बलात्कार केल्या जात आहे (कोपर्डी) कीती दुर्दशा ही शक्तिची पण तुम्ही हे विसरु नका मुळातच या समाजाला मी शक्तिची उपमा दीली आहे आणि सद्ध्या ती सुप्त अवस्थेतून जाग्रुत अवस्थेत येत आहे.
 मागील वर्षात मराठा समाजाने एकूण 58-60 मोर्चे काढलेत म्हणजेच त्यांना त्यांच्या दयणीय अवस्थेची जाणीव झाली आहे, त्यांची झोप तुटली आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने हे क्षेञिय बाहेर निघाले होते पण या वागण्यात सुद्धा त्यांचे तेज,स्वाभिमान, नम्रपणा ढळलेला दीसला नाही. तेच तेज, तोच नम्रपणा कोणत्याही मोर्चांना कलंक नाही की बेशिस्तपणा नाही साधा शिस्तबद्ध  लाखोंचा जनसागर जसा. स्वातंञ्यानंतरच्या भारताच्या इतीहासातील अप्रतीम पर्व . म्हणजे जाळपोळ नाही तोडफोड नाही नारेबाजी नाही , बेलगाम नेते नाही,  स्वनियंञित , स्वशासीत, स्वराज्याच्या मावळ्यांची आणि खरे शिवाजी महाराजांचे वंशज  असण्याची त्यांनी आठवन करुन दीली. ही शक्ती आहे स्वराज्याची या सर्वांत जे गुण लक्षण दिसून येत होती ती याच गोष्टींची प्रगल्भतेची जाणीव करुन देत होती की आम्ही भारत वर्षात स्वराज्य स्थापीले ते असेच नव्हे. यातुन बुद्धी आणि शक्तिचा संगम दिसून येत होता. ही एका नव्या युगाची नांदी असणार आहे.
    जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ती प्रत्येकाच्या मनाला आकर्षुण घेते पण ही फक्त सूरुवात असते या पालवीवर बरेच वातावरण पेलण्याची वेळ येते आणि यानंतर ती तारुण्यावस्थेत प्रवेश करते.आता मराठा समाजातील नेत्यानी त्याकडे लक्ष दीले आहे त्यांच्या मतांची पेढी असलेल्या या गटावरुन त्यांच्यात शाब्दिक रनकंद माजणार आणि श्रावणातील सततधार जशी पालवीला झोडपून झोडपून तारुण्य मिळवून देते त्याप्रमाणे यासर्व हल्यामुळे मराठा समाज भरकटनार नाही तर उर्जितावस्था प्राप्त करेल.  

Comments

Popular posts from this blog

Recalculate The world - 3

             मंदीत संधी सद्या भारतात ओरड होत असलेली आर्थिक मंदी ही काही ठराविक उद्योगांमध्येच दीसुन येते. हे उद्योग उपभोग्य व प्रतीष्ठेची प्रतीके आसलेल्या उत्पादनाची आहेत.  निसर्गाच्या पर्यायाने मानवाच्या विनाशासाठी कारणीभूत  असलेल्या उद्योगांमध्येच त्याचे प्रमाण अधिक जाणवते आहे. जिवणासाठी आवश्यक मुलभूत गरजांच्या  उद्योगांमध्येच त्याचे इतके प्रमाण जाणवत नाही.  राहीली पारलेची गोष्ट तर ही बिस्कीटे मानवासाठी आरोग्यवर्धक व पोषण घटक पुरवणारे अन्न नाही.    औद्योगिक  क्रांतीनंतर जग खुप वेगवेगळ्या वळणावरुण गेले आहे . खुप वेळा मंदीचा आनुभव घेतला आहे प्रत्येकवेळेस कारणे वेगवेगळे आहेत. यावेळच्या जागतिक  व भारतीय मंदीत थोडा फरक आहे. आजपर्यंत भारत यामध्ये आपली भुमीका पार पाडण्याइतका सक्षम नव्हता पण आज आहे . आज जगातील बहुतांशी देश आपापल्या अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी बंदीस्त economy कडे पाउले टाकत आहैत. तर भारतीय अर्थव्यवस्था एका वेगळ्याच प्रकारे वाटचाल करतांना दीसते आहे . मोदी सरकारच्या काळात जागतिक अर्थचक्रातून भारतीय अ...

Recalculate the world 2

चांगुलपणाच्या concept चा विचार चांगला मानुस म्हणजे काय ? ?                   ज्याला मानुसकी आहे                   ज्याला भूतदया आहे             जो सर्वांचे चांगले व्हावे आसा विचार करतो             जो दुरदृष्टीने विचार करतो             जो स्वार्थासाठी दुसऱ्याची माण कापत नाही             जो दुसऱ्याना सन्मान देतो             जो दुसऱ्याना त्यांच्या चांगल्या कामात                                                     मदत करतो              जो दुसऱ्याच्या चुका माफ करुन                                   ...

Recalculate The world - 4

वारकरी संप्रदाय,वैष्णव मार्ग,भगवत धर्म अशा इतरही भक्ती संप्रदायांत मुलांची वाढ होतांना शुद्ध दैवी  संपत्तीचे गुण मुलांमध्ये भरल्या जातात आणि तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते पण जेव्हा तो वर्तमान  सामाजिक व्यवहारात येतो तेव्हा त्याला खालावलेल्या वर्तमान समाजाची काळी बाजू  दीसुन येते समजली तर ठीक नाहीतर तो या औद्योगिक कालखंडातील मानवी दाणवांचा शिकार बनतो .            ब्रिटिशांनी ही भारत असाच संपवून त्यावर आपले साम्राज्य उभे केले आता ब्रिटिश नाहीत पण त्यांचे औद्योगिकरण अजुणही आहे आणि त्यांचे गुण संस्कृती आपल्या मानगुटीवर बसलेली आहे. हा केवळ सांस्कृतिक पराजयाचा प्रश्न नाही तर मानव संसाधनाच्या र्हासाचा कालखंड आहे. औद्योगीकरणाने आपल्याला काय दिले तर केवळ वेग दिला ज्याला आपण काळ सुद्धा म्हणू शकतो यातून मानवी संसाधनाचा विकास झाला का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कींवा माझ्यासारख्यांकडे या प्रश्नाचे  उत्तर' नाही 'असे आहे. केवळ GDP, HDI, सारखे निर्देशांक मानव संसाधनाचे संपुर्ण मुल्यांकण करु शकत नाहीत हे निर्देशांक आधूनिक काळानूसार वर्तमान प्रवाहातील मानवा...